Breaking
कृषीवार्तामहाराष्ट्र

भंडारदरा पाणलोटात धुवांधार पावसाचे तांडव…!

भंडारदरा धरण 15 जुलै पर्यंतच भरणार.

0 0 4 0 1 3

भंडारदरा, प्रतिनिधी.

उत्तर नगर जिल्ह्याचे कल्पतरू असलेले भंडारदरा धरण 15 जुलै पर्यंतच भरेल असे चित्र दिसत आहे. आठ दिवसापासून धो धो कोसळणारे पावसाच्या सरी आणि भरभरून वाहणारे ओढून नाले यामुळे धरणाची पाणीसाठा जलद गतीने वाढत असून आज सायंकाळपर्यंत धरणातील पाणीसाठा सत्तर टक्के एवढा होणार आहे.

कळसुबाई शिखरावरून वाहणारे धबधबे व प्रताप यामुळे या परिसरातील चित्र अतिशय विहंगमय असे पण दिसत आहे. पर्यटक मोठ्या संख्येने परिसरात येत आहेत. पांजरे फॉल, न्हाणी फॉल, वसुंधरा फॉल, नेकलेस फॉल, विल्सन फॉल, आदी सर्वच धबधबे धो धो कोसळत असून धरणाला जाऊन मिळत आहेत. त्याचबरोबर कोकण कड्यावरील रिव्हर्स फॉल सुरू झाले असून ते पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करत आहेत. एकंदरच गत अनेक वर्षात पहिल्यांदाच जुलैच्या पहिल्या आठवड्यातच धरणाचा पाणीसाठा 70 टक्के पर्यंत पोहोचला आहे.
अगस्ती अमृत न्यूज, भंडारदरा.

 

5/5 - (1 vote)

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे