Breaking
ब्रेकिंग

पडलेले माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या वक्तव्यावरून आदिवासी समाज आक्रमक….

संपादक -संजय मंडलिक

0 0 4 0 1 3

अकोले प्रतिनिधी /-

शिर्डी मतदार संघांचे पडलेले खासदार सदाशिव लोखंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन. शिर्डी लोकसभा मतदार संघात रावणाला मानणारा आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे त्यांना राम मंदिर बांधलेले रुचले नाही अशी वक्तव्य करून  आदिवासी समाजाला हिनवल्या मुळे आदिवासी समाज लोखंडे विरोधात आक्रमक झाला आहे. लोखंडे यांनी दहा वर्षांत किती विकास काम केली याच आत्म परीक्षण करण्याऐवजी लोखंडे यांनी कुठे तरी आदिवासी समाजावर आपल्या पराभवाचे खापर फोडले आहे.लोकप्रतिनिधी हा कुठल्याही एका समाजाचा नसतो त्यामुळे आपण पराभूत झाल्याचा आदिवासी समाजावर खापर फोडून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम लोखंडे यांनी केला आहे. आदिवासी समाज हा पारंपारिक वारकरी संप्रदायाला मानणारा आहे. प्रत्येक गावात मारुतीचे मंदिर, विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे आदिवासी भागातील भाविक फक्त पंढरपूर, त्रिंबकेश्वर, आळंदी, अयोध्या, काशी तिरुपती, कोल्हापूर, चारिधाम, वणी, महालक्ष्मी धार्मिक यात्रांना जात असतात आदिवासी समाजात अनेक लोक माळकरी आहेत, मंदिरांमध्ये भजन कीर्तन हे आदिवासी समाजात परंपरेनेकरत असतो. अनेक गावांमध्ये बोहड्याचा कार्यक्रम होतो या कार्यक्रमांमध्ये गणपती,भगवान श्रीकृष्णाचे, महालक्ष्मी, सरस्वती, विविध देवतांचे मुखवटे घालून नृत्य करत असतात. अकोलेतालुक्यात हरिचंद्र, रतनवाडी, येथे हजारो वर्षांपूर्वीचे प्राचीन शिवकालीन मंदिरे आहेत, आदिवासी समाज गणपती उत्सव, नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात सादर करतात. अकोले तालुक्यात कोदणी येथे वाल्मीक ऋषी मठ (सीता पाऊल आहे ) येथे प्रभू श्रीरामयांचे आगमन झालेले आहे. मात्र याचा माजी खासदारांना अभ्यास नसल्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना आपल्या वाचाळ भाषेचा दुरुपयोग करून दुखावल्या मुळे आदिवासी कार्यकर्ते, संघटना आदिवासी समाज आक्रमक झालाआहे.माजी खाजदार यांना समाजाने दहा वर्षी डोक्यावर घेतलं मात्र त्यांचा विकासाचा दर्जा बघून शिर्डी मतदार संघाने त्यांना नाकारलं याचा परिणाम त्यांच्या मेंदूवर झालं असल्याची प्रतिक्रिया आदिवासी संघटना आणि समाज देऊ लागला आहे. मात्र या निवडणुकीत आदिवासी काही नेत्यांनी लोखंडे यांना पाठींबा दिला. त्यांनी या लोखंडे यांच्या बद्दल निषेध व्यक्त केला आहे. भाजपचे माजी मंत्री मधुकर पिचड तसेच विजय भांगरे समाजसेवक अनंत घाणे, पांडुरंग पदमेरे, तुकाराम खाडे यांनी लोखंडे यांचा निषेध केला आहे . त्यामुळे माजी खाजदार यांनी आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी नाहीतर सर्व आदिवासी संघटना, कार्यकर्ते, आणि समाज  लोखंडे यांना अकोल्यात दिसल्यावर तोंडाला काळे फासल्या शिवाय रहाणार नाही असा आक्रमक पवित्रा संघटनेने आणि समाजाने घेतला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे