0
0
4
0
1
3
अकोले . प्रतिनिधी./-
उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेखा असलेले भंडारदरा धरण काल रात्रीच्या तुफान पावसाने 95 टक्के भरले असून हायड्रो आणि स्पिलवे गेट मधून 1928 क्युसेक वेगाने पाणी निळवंडे डॅम मध्ये सोडण्यात आले आहे. त्यामुळे निळवंडी धरणाची पातळी वाढत आहे. लवकरच निळवंडे धरण आहे भरण्याची शक्यता आहे.काल रात्री भंडारदरा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे पूर आला. त्यामुळे भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले असून फक्त लेवल मेंटेन ठेवण्याकरता पाणी सोडण्यात येत आहे. धरण परिस्थितीवर शाखा अभियंता अभिजीत देशमुख. कार्यकारी अभियंता व सर्व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. अगस्ती अमृत न्यूज. संगमनेर. अकोले.
0
0
4
0
1
3
