कळसुबाईच्या शिखरावरून.. संजय मंडलिक.
![]()
महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीत खडखडाट झाल्यामुळे खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेले फडणवीस सरकार मार्च एण्डला मात्र सर्वसामान्य माणसांच्या मुंडया पिरगाळून महसूल गोळा करण्याचे काम करताना दिसत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी शेहचाळीस हजार कोटी खर्च करणाऱ्या फडणवीस सरकारने सत्तेवर आल्यानंतर मात्र सपशेल माघार घेतली असून दिलेली आश्वासने पाळण्याबाबत मौन बाळगले आहे. लाडक्या बहिणींमुळे तिजोरीत खडखडाट झाला आहे आणि आता दिलेली आश्वासने पाळणे फडणवीस सरकारला शक्य होत नाही. त्यातच मंत्र्यांचा आणि आमदारांचा अवास्तव खर्च आणि 9000 कोटींचे राज्यावरचे कर्ज यामुळे बेजार झालेले फडणवीस सरकार आता मात्र सर्वसामान्य खिशात हात घालून कुठलेही दंड आणि कर आकारून तिजोरी भरण्याच्या मार्गावर आहे. खासदार आमदारांचे पगार वाढवून सामान्यांच्या खिशाला झळ देण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकार करत असून शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहेत. मात्र सत्तेत मश्गुल असणारे राजकारणी सत्तेत आल्यानंतर सामान्य जनतेला नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा विसरले असल्याचे प्रत्यक्ष दिसत आहे.जनतेला फसवुन सत्तेवर येऊन सर्व घोषणांचा सोयीस्करित्या विसर सत्ताधाऱ्यांना पडला असून सामान्य जनता पुढील वेळी या लबाडांना वटणीवर आणल्याशिवाय राहणार नाही. एकंदरच सत्तेवर येताच फडणवीस सरकारने सामान्य जनतेचा विश्वास गमावला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अगस्ती अमृत न्यूज. संगमनेर. अकोले.
