कोकणवाडी. पाचपट्टा भागातील जनतेने केलेल्या तक्रारीवरून समाज सेवक अनंत महादु घाणे सह कार्यकर्ते यांनी केला पाहणी दौरा..
संपादक -संजय मंडलिक
अकोले प्रतिनिधी /- मा.आमदार वैभव भाऊ पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणवाडी येथे भेटी दरम्यान येथील मा.सरपंच नारायण जाधव सह ग्रामस्थ यांनी अनेक समस्यांचा पाढा वाचला.गावातील रेशनकार्ड,रेशनिंग धान्य दुकाना बाबत समस्या, जल जीवनचे काम एक वर्षापासून बंद आहेत. रस्त्यांची दुरवस्था, शाळा खोली समस्या, विज पुरवठा व नवीन लाईन पोल , अशा अनेक समस्यांंबाबत लक्ष वेधले या संदर्भात मा.पुरवठा अधिकारी सातपुते सर . मा. गटविकास अधिकारी चौरे साहेब मा. चव्हाण साहेब यांच्याशी फोनवरून माहिती देऊन तातडीने कार्यवाही करण्यात येऊन कामे मार्गी लावण्यासाठी विनंती केली. यासंदर्भात आदेश काढुन प्रश्न सोडवू असे आश्वासन गटविकास अधिकारी यांनी दिले…. शिवाजीनगर येथील ग्रामस्थांनी केलेल्या पिण्याच्या पाण्याची तक्रारी, शाळा खोली समस्या शाळा गेट बांधणे, रस्त्यांची दुरवस्था या समस्यांचा पाढा ग्रामस्थांनी मांडला या संदर्भात मा. ग्रामविकास अधिकारी व सरपंच विठ्ठल गोडे यांच्यांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यासाठी नवीन पाण्याचीटाकी बांधणे कामी प्रस्ताव सादर करणेबाबत सुचना केली.

तिरडे येथील भेटी दरम्यान ग्रामस्थ उपस्थित कार्यकर्ते सरपंच विठ्ठल गोडे. मा.सरपंच सचीन गोडे. बाळु गोडे. ग्रामविकास अधिकारी.सह उपस्थित शेतकरी ग्रामस्थ यांनी गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडीचे काम निकृष्ट दर्जाचे केलेल्या तक्रारीवरून बांधकामांची पाहणी केली. संडास बाथरुम काम केले तेही अपुर्ण केलेले दिसुन आले. आतील बाजूस भिंतीतुन पाणी ओलावा दिसुन आला. ग्रामस्थांच्या तक्रारीवरून मा. गटविकास अधिकारी चौरे साहेब व मा. बिंद रावसाहेब यांच्याशी फोनवरून संपर्क करून केलेल्या कामांची माहिती घेतली. काम निकृष्ट दर्जाचे माहिती दिली. बिंद रावसाहेब यांनी मी स्वतः तातडीने दोन दिवसांत येऊन काम चांगले दर्जाचे पुर्ण करुन देतो असे आश्वासन दिले. कामे चांगली न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांसह समाज सेवक.अनंत घाणे, बाजीराव सगभोर.रामदास पिचड. ढवळा भांगरे.राजाराम साबळे यांनी दिला. तलाठी कार्यालयाचे बांधकाम एक वर्षापासून बंद असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग अकोले मा. वाकचौरे रावसाहेब यांच्याशी संपर्क साधून कामांची माहिती घेतली. तलाठी कार्यालयाचे बांधकाम करण्यासाठी फोन वरून तातडीने ठेकेदारास काम करण्यासंबंधी सुचना केल्या. कामे चांगली व पुर्ण करुन देतो असे आश्वासन दिले. या बाबतीत तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करु असे आश्वासन वाकचौरे साहेबांनी दिले. रेशनिंग धान्य मिळत नसल्याने ग्रामस्थांनी कैफियत मांडली याबाबत मा.चौघुले साहेबांना माहिती दिली व कार्यवाही करण्या बाबत सुचना केली. या संदर्भात ग्रामस्थांशी केलेल्या चर्चेतून रस्त्यांची , आरोग्य , वीज . मुक्कामी बस . भात पिक विमा. वैयक्तिक लाभाच्या योजना. अशा समस्यांविषयी कैफियत मांडल्या. व लक्ष वेधले या समस्या मा. आमदार वैभवभाऊ पिचड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सोडवू अशी चर्चा केली . यावेळी उपस्थित समाज सेवक अनंत महादु घाणे. बाजीराव सगभोर. रामदास पिचड .ढवळा भांगरे . राजाराम साबळे. सरपंच विठ्ठल गोडे. मा.सरपंच सचीन गोडे. बाळु गोडे.रामदास गोडे. ग्रामविकास अधिकारी. कार्यकर्ते.उपस्थित कार्यकर्ते, ग्रामस्थ भरत घाणे. तुकाराम खाडे.तुकाराम गोडे.भिमा जाधव. अर्जुन जगताप.कचरू सारुक्ते. निवृत्ती गोडे. नवसु गोडे. बाळु गोडे. राहुल गोडे. यांनी विविध समस्यांवरील चर्चा केली. शिवाजीनगर येथील शाळेची गळती होत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत या संदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. कोकणवाडीतील पिण्याच्या पाण्याची नियमितपणे व्यवस्था करावी यासंबंधीचे जलजीवनचे संबंधित सांळुके रावसाहेब व गटविकास अधिकारी चौरे साहेब यांच्याशी फोनवरून संपर्क करून कामे लवकर मार्गी लावण्यासाठी विनंती , सुचना केली.
