
0
0
4
0
1
3
भंडारदरा. प्रतिनिधी. /-भंडारदरा परिसरात सध्या सुरू असलेल्या काजवा महोत्सवाला भेट जाण्यासाठी चक्क जर्मनी हून पाहुणे दाखल झाले असून त्यांनी काजवे पाहण्याचा मनमुराद आनंद लुटला.त्याचबरोबर परिसरातील अमृतेश्वर मंदिराला भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले. सांदण व्हॅली पाहून त्यांनी हे जगातले एक आश्चर्य असल्याची भावना व्यक्त केली तर कळसुबाई शिखर सर करण्यासाठी पुढील वर्षी नक्की येऊ असे त्यांनी सांगितले.
एकंदरच भंडारदरा परिसर हा केरळ काश्मीर पेक्षाही सुंदर असून येथील माणसे अतिशय प्रेमळ आणि सेवाभावी वृत्तीची असल्याचेही ते म्हणाले. भंडारदराचा महोत्सव आता साता समुद्रापार पोहोचला असून भविष्यात या परिसरात काजवे पाहण्यासाठी अनेकांना घेऊन येणार असल्याचे त्यांनी सांगितले. अगस्ती अमृत न्यूज,भंडारदरा.
0
0
4
0
1
3
