Breaking
ब्रेकिंग

अकोले तालुका अतिवृष्टी यादीत समाविष्ट; वारंघुशी परिसरातील शेतकऱ्यांकडून मा. आ. वैभवभाऊ पिचड यांना धन्यवाद!!

अकोले तहसीलदारांच्या वागणुकीचा निषेध.

0 0 4 0 1 3

अकोले तालुक्याला अखेर अतिवृष्टीग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आल्याने वारंघुशी, पेंडशेत, बारी, खिरविरा, अंबीत परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत मा. . वैभवभाऊ पिचड यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

अकोले तालुक्यातील घाटघर, शेंडी, भंडारदरा, वारंघुशी, खिरविरा, अंबीत या भागात पावसाचा तडाखा सर्वाधिक बसला. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी घरांची पडझड, जनावरांच्या हानीसह मोठा आर्थिक तोटा झाला आहे.

परंतु प्रशासनाच्या चुकीमुळे प्रारंभी शासनाने तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त यादीत घेतल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मा. . वैभवभाऊ पिचड यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापर्यंत पोचवल्या. नाशिक येथे झालेल्या बैठकीत दोन्ही मान्यवरांना सविस्तर माहिती देताचतातडीने आदेश निघाले आणि अकोले तालुका अतिवृष्टीग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आला.

या निर्णयानंतर वारंघुशी, पेंडशेत, बारी सह परिसरातील ग्रामस्थांनी भाऊंचे आभार मानले.

दरम्यान, अतिवृष्टीचा समावेश झाल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी तहसीलदार यांना तातडीने पंचनामे करण्याचे निवेदन दिले असता तहसीलदारांनी शेतकऱ्यांशी आणि माजी . वैभवभाऊ पिचड यांच्याशी असभ्यबेशीस्त भाषेत बाचाबाची करत जे गैरवर्तन केले त्या सर्व प्रकाराचा निषेध शेतकऱ्यांनी व्यक्त करत तहसीलदारांविरुद्ध निलंबनाची मागणीकेली आहे. तसेच त्यांच्या कार्यकाळातील  कारभाराची चौकशी करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी उपस्थित अनंत  महादु घाणे, कृउबास संचालक तुकाराम  खाडे, मारुती खाडे, दीपक भागडे, संजय कडाळी, विजय  पदमेरे, ठकेश कडाळी, दिलीप भागडे. पंढरी खाडगीर, दिलीप भांगरे, देविदास भागडे, लक्ष्मण भागडे, एकनाथ धादवड, नामदेव वळे,पांडुरं पदमेरे, नामदेव लोटे, राजू भागडे, सह शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र येत  शासन, प्रशासन  शेतकऱ्यांचा आवाजदडपणार नाहीअसा इशारा देत याहीपेक्षा   शेतकरी मोठ्या संख्येने वारंघुशी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करतील असा इशारा शासनाला, प्रशासनाला दिला.

– अकोले प्रतिनिधी.

अहिल्यानगर.

5/5 - (1 vote)

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे