भंडारदरा. प्रतिनिधी. /- भंडारदरा धरण यंदा 15 ऑगस्टला पूर्ण क्षमतेने न भरवता ऑगस्टच्या शेवटी एक सप्टेंबरच्या दरम्यान भरवणार असल्याची माहिती हाती आली आहे. दरवर्षी मात्र भंडारदरा धरण 15 ऑगस्टला पूर्ण क्षमतेने भरवतात. यंदा मात्र तीन ऑगस्ट रोजी धरण तशा अर्थाने पूर्ण क्षमतेने भरले होते.

परंतु हायड्रो प्रोजेक्ट नंबर एक व स्पिलवेद्वारे पाणी खाली सोडल्याने धरणाची लेव्हल मेंटेन ठेवण्यात आली. एक ते दीड फुटाच्या दरम्यान धरण रिकामे ठेवण्यात आले. आजही ती लेवल मेंटेन ठेवण्यात येत असून हायड्रो प्रोजेक्ट मधून पाणी खाली सोडले जाऊन वीज निर्मिती करण्यात येत आहे तर स्पिलवेद्वारे लेव्हल मेंटेन ठेवण्यात येत आहे. यंदा मात्र धरण 15 ऑगस्ट ऐवजी एक सप्टेंबरलाभरवण्याचे नियोजन असल्याचे समजते आहे. धरणाच्या भिंतीजवळची उंची 215 फुटा पैकी 213.5 ते 214 फुटापर्यंत मेंटेन ठेवण्यात येत आहे. गट दोन दिवस मात्र पावसाने पूर्ण उघडीत दिली असून भंडारदऱ्यात ऊन पडले आहे. अगस्ती अमृत न्यूज. भंडारदरा.
