Breaking
ब्रेकिंग

अकोले तालुक्यातील घाटनदेवी मार्गे जाणाऱ्या गेवराई शहापूर मार्गाला तातडीने मंजुरी द्यावी म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी घेतली केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांची भेट..

0 0 4 0 1 3

दिल्ली प्रतिनिधी : शेवगाव –भेंडा कारखाना –नेवासा –श्रीरामपूर –बाभलेश्वर लोणी –संगमनेर –अकोला –शेंडी यांना जोडणारा शहापूर येथे NH-८४८ (जुना NH-३)सह जंक्शनवर समाप्त होणारा गेवराई जवळील NH-52 (जुना NH-२११) वर महामार्गास तातडीने मंजुरी द्यावी अशी मागणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांची समक्ष भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली .सदर निवेदनात त्यांनी NH-52 (जुना) च्या जंक्शन पासून सुरु होणारया विद्यमान राज्य महामार्गाला (SH 50 ) राष्ट्रीय महामार्ग म्हणून जोडणे बाबत सदर प्रस्तावाची आवश्यकता निदर्शनास आणून दिली. सदर महामार्गामुळे बीड ,अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव ,नेवासा ,श्रीरामपूर ,संगमनेर ,अकोले या तालुक्यांसह ठाणे जिल्ह्यातील शहापूर जोडले जाणार आहे . याबाबत मंत्री महोदय श्री गडकरी यांनी सकारात्मकता दाखवून तातडीने कार्यवाही करणेबाबत निर्देश दिलेत. याबद्दल सडक व परिवहन मंत्री श्री नितीन गडकरी यांचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी आभार मानले.

1/5 - (1 vote)

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे