Breaking
ब्रेकिंग

शेंडी व भंडारदरा येथील फॉरेस्ट टोल नाके हलवण्यात यावेत.. अमित भांगरे. टोल नाक्यावर आज नऊ गावांमधील आदिवासींचे मोठे आंदोलन.

टोल नाक्यावर जमा होणारी अर्धी रक्कम नऊ गावांमधील ग्रामपंचायतींना देण्याची मागणी. - भंडारदरा प्रतिनिधी.

0 0 4 0 1 3

आज सकाळी 11 वाजता शेंडी येथील फॉरेस्ट खात्याच्या टोल नाक्यावर नऊ गावांमधील आदिवासी तरुणांनी रास्ता रोको आंदोलन केले आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा बँकेचे संचालक राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष अमित भांगरे यांनी केले, समवेत नऊ गावांमधील तरुणांसह मारुती बांडे, भरत घाणे, सरपंच, उपसरपंच, आदींसह विवीध गावांमधील पदाधिकारी कार्यकर्ते हजर होते. यावेळी आदिवासी पट्ट्यातील वर्ग दोन च्या जमिनी वर्ग 1 च्या करण्यात याव्यात ही मुख्य मागणी करण्यात आली. तर टोल नाका हलविण्यात यावा. तसेच टोलनाक्यामधील अर्धी रक्कम नऊ गावांमध्ये ग्रामपंचायतींना विकासाकरता देण्यात यावी. आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींना देण्यात येऊ नयेत. ज्या दिल्या गेल्यात त्या परत आदिवासींच्या नावावर कराव्यात याव्यात.

स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा. बाहेरची मंडळी येऊन आदिवासींना फसवून जमिनी घेत असून त्यांचा बंदोबस्त करण्यात यावा. आदी अनेक मागण्या मांडण्यात आल्या. यावेळी वन्यजीव चे आर एफ गावीत साहेब तसेच लांडेसाहेब, तळपाडे साहेब सर्व कर्मचारी नायब तहसीलदार श्रीयुत लोहारे आदींसह राजुर पोलीस स्टेशनचे पीएसआय पवार यांचे अनेक अधिकारी उपस्थित होते. रास्ता रोको सुमारे दीड तास चालला. यात विविध मागण्या मांडण्यात आल्या. या मागण्या सोडवण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले.
 – अगस्ती अमृत न्यूज, भंडारदरा.

1/5 - (1 vote)

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे