नवरात्र उत्सवात कळसुबाईच्या शिखरावर भाविकांची मांदियाळी…!
माची मंदिर विकासात योगदान देण्याचे परिसरातील कार्यकर्त्यांचे आव्हान...
नवसाला पावणारी आदि शक्ती शिखर स्वामीनी माता कळसुबाई…!
महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर विकासाच्या प्रतिक्षेत.
–अहिल्या नगर.
अकोले तालुक्यातील बारी हे आदिवासी वस्ती असलेले गाव. ठाणे, नाशिक या दोन्ही जिल्ह्यांच्या टोकावर असलेले माताकळसुबाई शिखर. निसर्गाने नटलेल्या या परिसरात चैत्र महिन्याच्या नवरात्र उत्सवात हजारो भाविक दर्शना साठी व नवस फेडन्यासाठी येतात. शिखरावर जाण्यासाठी बारी, जहागीरदार वाडी येथुन जाता येते. दरवर्षी पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. शिखरावर पुरातन मंदिर आहे. पायथ्याशी मातेचे मंदिर असून नवीन माची मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम चालू आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर या ठिकाणी पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्या करता देवस्थान समितीने अनेक उपाययोजना करण्यासाठी शासन विभाग यांचेशी अनेक वेळा प्रयत्न केले आहेत. तत्कालीन माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेब व मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या माध्यमातून शीखरावर विजेची सोय करण्यात आली. येण्या जाणे साठी पायरी व्यवस्था व शिडी व्यवस्था करण्यात आली. मा. पिचड साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी आजपर्यंत अनेक कामे करण्यात आली. याठिकाणी अजूनही बरेच काही काम बाकी आहे. तत्कालीन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे साहेब यांच्या व पर्यटन विभाग नाशिक यांचे सूचनेने कळसुबाई शिखर व माची मंदिर परिसर सुशोभीकरण यासाठी दिड कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला परंतू सरकार बदल झाला आणि त्या खर्च निधीस स्थगिती देण्यात आली. तरीही बारी गावचे माजी सरपंच, देवस्थान समिती चे विश्वस्त तुकाराम पाटील खाडे, समाज सेवक अनंत महादु घाणे साहेब तसेच अनेक सहकारी यांनी माजी आमदार वैभव भाऊ पिचड, माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब, पर्यटन माजी मंत्री लोढा साहेब, आमदार किरण लहामटे साहेब, अशोकराव भांगरे साहेब यांच्या भेटी घेऊन या पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. यापुढेही देवस्थान समिती चे सर्व सदस्य विश्वस्त, सहकारी मित्र देवस्थान च्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. देवस्थान समितीच्यामाध्यमातून माची मंदीरचे जीर्णोद्धार काम सुरू आहे. यात समाज सेवक अनंत घाणे साहेब, पत्रकार संजय मंडलिक साहेब, रामदास पिचड, सुरेश गभाले व बारी गावचे तरुण मित्र मंडळ सहकारी माची मंदीर काम करत आहे. महाराष्ट्राची शान, अहिल्या नगर चे मान, अकोले तालुक्याचे भुषण, समाजाची अस्मिता व श्रद्धास्थान माता कळसुबाई शिखरमंदिर परिसर वमाची मंदिर परिसर या विकासासाठी देवस्थान समिती विश्वस्त सिताराम खाडे, भिमराज अवसरकर, रामदास खाडे, वाळू खाडे, निवृत्ती चव्हाण, माजी सरपंच, देवस्थान समिती विश्वस्त तुकाराम खाडे यांनी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, अहिल्यानगर पालक मंत्री विखे पाटील साहेब, शिर्डी मतदार संघातील खासदार वाकचौरे साहेब, आमदार किरण लहामटे साहेब, माजीआमदार वैभव भाऊ पिचड साहेब, युवा नेते अमित भांगरे साहेब, या सर्वांनी विकास करणे कामी पुढाकार घेऊन कळसुआईमंदिराचा जीर्णोद्धार करावा अशी मागणी विश्वस्त व जनतेने केली आहे.
