Breaking
ब्रेकिंग

आजी-माजी आमदारांसह चार भावी आमदारांचाही आदिवासी दिन उत्साहात साजरा. 

संपादक -संजय मंडलिक

0 0 4 0 1 3

अकोले. प्रतिनिधी./-

जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आज 9 ऑगस्ट रोजी अकोल्यात अक्षरशा जत्रेचे स्वरूप आले होते. आजी- माजी आमदारांसह तालुक्यातील चार भावी आमदारांनीही जोरदारपणे ताकद लावत आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला.एकंदरच येणाऱ्या विधानसभेत तालुक्यात सहा आमदार आजच तयार असल्याचे आदिवासी दिनाच्या निमित्ताने दिसून आले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने गत आठ दहा दिवसांपासून सर्वच आदिवासी नेते आदिवासी दिनाचा जल्लोष साजरा करण्याकरता तयारी करत होते. यात सध्याचे आमदार डॉ. किरण लहामटे आघाडीवर होते.

तर माजी आमदार वैभव पिचड यांनी मात्र राजुर मध्येच आदिवासी दिन साजरा करण्याचे नियोजन केले होते.पोलिसांनी डीजेला बंदी केल्यामुळे यावेळेस ढोल ताशांच्या गजरातच आदिवासी दिन साजरा झाला. त्याचबरोबर भावी आमदार अमित भांगरे. यांनी बारामतीचा आर्केस्ट्रा आणला होता तर मारुती मेंगाळ.

सतीश भांगरे. मधुकर तळपाडे यांनीही आपापल्या कार्यकर्त्यांसह आदिवासी दिन उत्साहात साजरा केला. चार दिशेला सहाआदिवासी नेत्यांनी जागतिक आदिवासी दिन साजरा केला. प्रत्येकाने जोरदार शक्ती प्रदर्शन केले. आदिवासींचे पारंपारिक नृत्य आणि कार्यक्रम सादर करण्यात आले. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे धांगडधिंगा आणि नाचकाम हेच मुख्य आकर्षण होते.

काही ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून आदिवासी कला जोपासण्याचे काम आदिवासी दिनाच्या निमित्ताने झाले मात्र अनेक ठिकाणी तरुणाईचा धांगडधिंगाणा पहावयास मिळाला आदिवासी पुढारी राजकारणाच्या नादात आदिवासी तरुणाईला वाहवत नेण्याचे काम करताना दिसून आले आदिवासी तरुणाई मोठ्या प्रमाणात गुटखा आणि दारूच्या आहारी असल्याचेही या निमित्ताने पहावयास मिळाले.गुटख्याची आणि दारूची मोठ्या प्रमाणात अकोल्यात विक्री झाली. अशा रीतीने आदिवासी दिन जोरात साजरा झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे