Breaking
ब्रेकिंग

भंडारदरा धरण 80 टक्के भरले.

संपादक -संजय मंडलिक

0 0 4 0 1 3

भंडारदरा प्रतिनिधी /-

उत्तर नगर जिल्ह्याची जीवनरेखा असलेले भंडारदरा धरण आज  80 टक्के भरले असून  धरणातील पाणीसाठा8521 दशलक्ष घनफुटावर पोहोचला आहे.

भंडारदरा धरण पाणलोटक्षेत्रात गत दोन दिवस तुफान पर्जन्यवृष्टी सुरू असून धरणात जोरदार पाण्याची आवक सुरू आहे. परिसरातील सर्व ओढे नाले दुथडी भरून वाहत असून भंडारदरा धरणास येऊन मिळत आहेत.

घाटघर डॅमचेही पाणी भंडारदरा धरणात सोडले जात असून त्यामुळे पाणी साठा जलद गतीने वाढत आहे. भिंतीजवळची उंची 270 फुटापैकी 202 फूट झाली असून पावसाचे प्रमाण असेच राहिल्यास 15 ऑगस्ट पूर्वी धरण भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भंडारदरा धरण परिसरात गत 24 तासात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे.. भंडारदरा 180 मिलिमीटर. घाटघर 345 मिलिमीटर. पांजरे 315 मिलिमीटर.रतनवाडी 326 मिलिमीटर. याप्रमाणे असून मुळा नदीलाही पूर आला आहे. कोतूळचा फ्लो 29533 क्युसेकने मुळा धरणाला जाऊन मिळत आहे तर निळवंडे धरणातही पाण्याची आवक सुरू असून आढळा परिसरात पावसाचे प्रमाण चांगले आहे. अगस्ती अमृत न्यूज. संगमनेर. अकोले.

1/5 - (1 vote)

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे