Breaking
ब्रेकिंग

डॉ. अनंत घाणे यांच्या पाठपुराव्याला यश…!

आदिवासी भागात आता सहा ऐवजी आठ तास सुरळीत वीजपुरवठा. अकोले, प्रतिनिधी. भंडारदरा.

0 0 4 0 1 3


भंडारदरा परिसरातील
नऊ गावांमध्ये फक्त सहा तास वीजपुरवठा केला जात होता मात्र जनसेवक पाठपुरावा करून वेळोवेळी निवेदन देऊन आदिवासी भागातील वीजपुरवठा आता आठ तास सुरळीत केला असून त्यामुळे आदिवासी भागातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून डॉक्टर घाणे यांचे आदिवासी जनता कौतुक करत असून अभिनंदन करत आहे. याबाबतचेसविस्तर वृत्त असे की, आदिवासी पट्ट्यामध्ये फक्त सहा तास वीज पुरवठा दिला जात होता. मात्र डॉक्टर घाणे यांनी कृपयापर्यंत सोनवणे साहेब तसेच शाखा अभियंता बेंडकुळी साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. माननीय कार्यकारी अभियंता यांच्याकडे पत्र व्यवहारही केला, तसेच रात्री ऐवजी दिवसा वीसपुरवठा करावा अशी मागणी केली. कारण रात्रीबिबट्यांची दहशत जनतेने घेतली असून नरभक्षी बिबट्यांचे प्रमाण वाढले आहे. डॉक्टर घाणेंच्या पाठपुराव्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी आता सहा ऐवजी आठ तास सुरळीत वीजपुरवठा देण्याचे मान्य केले आहे. डॉक्टर घाणे यांनीही  वीज वितरणकंपनीचे अधिकार्‍यांचे आभार मानले आहेत. डॉक्टर घाणे यांची समवेत यावेळी उपस्थित सरपंच राजाराम झडे, सरपंच सागर रोंगटे आदींसह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे