Breaking
ब्रेकिंग

भंडारदरा परिसरात पावसाची उघडीप..उन पडले. जलसंपदा विभागाने धरण भरून घेणे गरजेचे.. 15 ऑगस्ट निमित्त होणाऱ्या गर्दीमुळे एकेरी वाहतूक.

संपादक -संजय मंडलिक

0 0 4 0 1 3

अकोले. प्रतिनिधी. /- भंडारदरा परिसरात गत दोन दिवस पावसाने उघडीप दिल्याने ऊन पडले आहे. ओढे नाले पूर्ण आटले आहेत. तर डोंगर माथ्यावरून कोसळणारे धबधबे बंद झाले आहेत मात्र धरण पूर्ण क्षमतेने भरवले गेले नाही. जलसंपदा खात्याने पावसाचा अंदाज घेऊन धरण भरून घेणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक आदिवासी व्यक्त करत आहेत. 15 ऑगस्ट मुळे होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी एकेरी वाहतूक केली असून सर्वत्र पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आहे.असा आहे वाहतुकीचा मार्ग रंधा धबधबा येथुन भंडारदरा धरणाकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असुन भंडारदर्‍याला वाकी फाटा /वारंगघुशी फाटा , चिचोंडी फाटा , हॉटेल यश , शेंडी , भंडारदरा धरण असा मार्ग राजुर भागातून जाणाऱ्या पर्यटकांसाठी राहणार असून नासिक मुंबईकडून येणाऱ्या पर्यटकांसाठी वारंघुशी फाटा , चिचोंडी , हॉटेल यश , शेंडी, भंडारदरा धरण असा असणारा असून रंधा धबधबा मार्गे पर्यटकांना बाहेर पडता येणार आहे . एकेरी वाहतुकीचा मार्ग हा फक्त स्वातंत्र्य दिनी अवलंबण्यात येणार असल्याची माहिती राजुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे यांनी दिली आहे . पर्यटकांनी सदर दिलेल्या मार्गावरूनच भंडारदरा पर्यटनाचा आनंद लुटावा असे आवाहन राजुर पोलिसांनी केले आहे. राजुर पोलिसांकडून स्वातंत्र्यदिनी एकेरी वाहतुकीचा अवलंब करण्यात आला आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे