दुसरे राज्यस्तरीय प्रगतिशील आदिवासी साहित्य संमेलन राजूर येथे भव्यदिव्य स्वरूपात…
अकोले | प्रगतिशील लेखक संघ, अकोले यांच्या वतीने आयोजित दुसरे राज्यस्तरीय प्रगतिशील आदिवासी साहित्य संमेलन रविवार, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी एडवोकेट मनोहरराव देशमुख कॉलेज, राजूर येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या संमेलनाच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध साहित्यिक संजय दोभाडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. उद्घाटनप्रसंगीमहाराष्ट्राचे नामवंत साहित्यिक मा. मिलिंद कसबे यांच्या हस्ते समाजातील अनिष्ट परंपरांचा दहन करून उद्घाटन होणारआहे. तर लोककवी प्रशांत मोरे हे प्रमुख पाहुणे व कवी संमेलन अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.
राज्यकर उपायुक्त मुरलीधर बांडे हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. संमेलनात उद्घाटन सत्र, परिसंवादव कवी संमेलन अशी तीन महत्त्वपूर्ण सत्रे होणार असून, परिसंवादाचा केंद्रबिंदू विषय “आदिवासी संस्कृतीचे खरे मारेकरीकोण?” असा असणार आहे. डॉक्टर जालिंदर घिगे, सोमनाथ कातडे, लोक पंचायत संगमनेर हुबळे साहेब, इंडियन स्कूलऑफ डेमोक्रसी संसद भवन नवी दिल्ली, विशाल पोटिंदे वक्ते म्हणून असण्याची शक्यता आहे.
या कार्यक्रमासाठी संगमनेरचे कवी संजयकुमार शिंदे यांनी मोलाचे सहकार्य केले आहे. तसेच या अधिवेशनात प्रगतिशीललेखक संघ अकोले येथील नामवंत कवी व साहित्यिकांची निवडही केली जाणार आहे.
यंदाच्या संमेलनाला राज्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यामध्ये उपायुक्त मा. राहुल पिचड, माजी अप्परराज्यकर आयुक्त वसंतजी पिचड, कवी यशवंत घोडे, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे रामनाथ भोजने, समाजसेवक अनंत महादू घाणे. संविधान साक्षरता ग्राम अभियानाचे विलास पवार, के. ए. ग्रुपचे अकोले अध्यक्ष अरुणभाऊगोंदके, कवी तानाजी सावळे, कवयित्री दिपाली धांडे–साबळे, प्रा. गंगाराम डगळे, गौतम शिंदे, कवी संजय साबळे, कवी अर्जुनबांबेरे, डॉ. बापू चंदनशिवे, कवी गौतम वाघमारे, नगरचे संजय तळपाडे, अॅड. गोमता पावरा, उमेश बांबळे, मनोहर शिंदे, उल्हास देठे, किशोर गभाले, योगेश गिळदे, सिनेट सदस्य मा. नितीन तळपाडे, संजय गोडे (सांदण परिवार), मधुकर भांगरे, साहित्यिक राजू ठोकळ, सुरेखा लेंबे, दिगंबर नवाळी, माजी डेप्युटी कलेक्टर मा.कृष्णा घोडे साहेब आदी मान्यवरांचा समावेशआहे.
अकोले तालुक्यातील सर्व जनतेचा मोठा सहभाग या संमेलनात असणार आहे. मागील अधिवेशनात प्रगतिशील लेखक संघाचेराष्ट्रीय सचिव व कादंबरीकार राकेश वानखेडे यांनी आदिवासी व बहुजन समाजावर सखोल मांडणी केली होती. यंदा तशीचप्रभावी मांडणी अध्यक्षस्थानी बसलेले साहित्यिक संजय दोभाडे करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
कार्यक्रमात साहित्यिक तुकाराम चौधरी, पुणे विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख तुकाराम रोंगटे, प्रगतिशील लेखक संघजिल्हाध्यक्ष प्रमोद अहिरे, डॉ. संजयकुमार भवारी, कवी देवचंद महाले, कवी कृष्णा राऊत, देवदत्त चौधरी, विशाल कुंदेआदींचा सहभाग राहणार आहे.
याही वर्षी आजी माजी आमदार यांचे सहकार्य लाभणार आहे. सर्व पत्रकार बंधू, मीडिया बंधू, पत्रकार संघटना, सर्वसमाजातील संघटना, सर्व आदिवासी संघटना, वकील संघटना सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक यांचा मोठ्या प्रमाणातसहभाग असणार आहे.
सांस्कृतिक अंगानेही मोठा सहभाग असणार आहे. जयेश पटेकर, जयंत पाटेकर, गायक विक्रम कवठे, चित्रकार कविराजबोटे, रॅप स्टार माही घाणे, नंदुरबारचे कवी संतोष पावरा, साहित्यिक डॉ. सखाराम डाखोरे यांनी प्रबोधनपर सादरीकरण केलेहोते.
विशेष म्हणजे, यंदाही हे संमेलन यशस्वीरित्या पार पडेल, कारण कवी प्रशांत मोरे यांची उपस्थिती आणि ५० हून अधिककवींचा लेखकांचा सहभाग संमेलनाला अधिकच रंगतदार बनवणार आहे.
पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.तुकाराम रोंगटे सर व डॉ. संजय लोहकरे हे तालुक्यातील महत्त्वाचे साहित्यिक यांनीसुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. सांदण परिवार, सह्याद्रीतील आदिवासी बांधव, आंबेडकरी चळवळ, बहुजनसमाज अशा विविध चळवळींमधील कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग राहणार आहे.
संयोजक मंडळाने सर्व साहित्यप्रेमींना संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
