Breaking
ब्रेकिंग

भंडारदरा धरणात आले तीन टीएमसी पाणी.

संपादक -संजय मंडलिक

0 0 4 0 1 3

भंडारदरा प्रतिनिधी /- उत्तर नगर जिल्ह्याचे कल्पतरू समजले जाणाऱ्या भंडारदरा धरणात आत्तापर्यंत तीन टीएमसी पाणी आले असून पावसाचा जोर काहीसा ओसरला असला तरी पाण्याची आवक ओढे नाले सुरू असल्याने सुरूच आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठा 3037 दश लक्ष घनफुटावर पोहोचला असून भिंती जवळची उंची 270 पैकी 149 फूट झाली आहे.

निळवंडे धरणात मात्र अद्याप पाण्याची आवक नाही. भंडारदरा परिसरात मागील आठवड्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली त्यामुळे परिसरातील ओढे नाले प्रवाहित झाले. त्याचबरोबर घाटघर डॅम मधले पाणी भंडारदरा धरणात सोडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा साठा जलद गतीने वाढत असून पावसाचा जोर असाच राहिल्यास 15 ऑगस्ट पर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज स्थानिक आदिवासी व्यक्त करत आहेत. भंडारदरा परिसरात पडलेला पाऊस पुढीलप्रमाणे भंडारदरा 355 मिलीमीटर घाटघर 390 मिलिमीटर मांजरे 380 मिलिमीटर आणि रतनवाडी ३०८ मिलिमीटर.

परिसरातील पांजरे फॉल नाणी फॉल नेकलेस फॉल वैशाली फॉल त्याचबरोबर कळसुबाईच्या शिखरावरून कोसळणारे सर्व धबधबे सुरू आहेत. तर घाटघर परिसरात आणि सांदण व्हॅली येथे रिवर्स फॉलही सुरू झाले आहेत. एकूणच भंडारदरा परिसराने सर्वत्र हिरवा शालू पांघरला असून पर्यटकांची गर्दी होत आहे. अगस्ती अमृत न्यूज. भंडारदरा.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे