Breaking
ब्रेकिंग

भंडारदरा धरण 50 टक्के भरले.

संपादक -संजय मंडलिक

0 0 4 0 1 3

भंडारदरा प्रतिनिधी /-

उत्तर नगर जिल्ह्याचे जीवन रेखा असलेले भंडारदरा धरण आज सायंकाळी सहा वाजता पन्नास टक्के भरले असून पावसाचा जोर अद्यापही टिकून आहे. परिसरातील ओढे नाले धो धो वाहत असून धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच आहे. घाटघर डॅमचे पाणीही भंडारदरा धरणाकडे वळविण्यात आल्याने धरणाचा पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे. घाटघर येथील धरणातील पाणी भंडारदरा धरणामध्ये सोडले जात आहे .

त्यामुळे धरणाचा पाणीसाठा जलद गतीने वाढत आहे. परिसरातील सर्व ठिकाणी डोंगरांनी हिरवा शालू पांघरला असून धुक्याची झालर सर्वत्र दिसून येत आहे.पर्यटकांची शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अनेक ठिकाणी पर्यटक धबधब्यांजवळ गर्दी करत होते. एकंदरच भंडारदरा परिसर अत्यंत रमणीय व निसर्गरम्य बनला असून पन्नास टक्के धरण भरल्यामुळे पाणलोट क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. 15 ऑगस्टपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरेल असा अंदाज आदिवासी बांधव व्यक्त करत आहेत.

परिसरातील आदिवासींची भात आवण्यांची कामे उरकत आली असून दहा टक्केच कामे शिल्लक आहेत. निळवंडे धरणाचा पाणीसाठा ही 21 टक्क्यांवर पोहोचला असून निळवंडेतील पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदरा धरणातील पाणीसाठा आज सायंकाळी 5450 दशलक्ष घनफूट झाला असून भिंतीजवळची उंची 180 फुटावर पोहचली आहे. धरण परिसरातील गावांमध्ये आत्तापर्यंत पडलेला पाऊस पुढील प्रमाणे भंडारदरा 542 मिलिमीटर. पांजरे 821 मिलिमीटर. रतनवाडी 906 मिलिमीटर. घाटघर 1046 मिलिमीटर. याप्रमाणे असून रिमझिम पावसाचा जोर टिकून आहे. त्यामुळे दिवसागणिक पाणीसाठा वाढतच आहे.अगस्ती अमृत न्यूज. भंडारदरा.

4/5 - (1 vote)

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे