Breaking
ब्रेकिंग

चिमुकल्या अपंग आदित्यचा फोफसंडी येथे कड्याकपारीच्या गुहेत संघर्ष चालू 

संपादक -संजय मंडलिक

0 0 4 0 1 3

राजूर प्रतिनिधी /-

हे वास्तव सत्य आहे .अकोले तालुक्यातील आदित्य वळे अजुनही गुहेत जगण्यासाठी संघर्ष चालू असून . आज २१ व्या शतकात वावरत असताना तंत्रज्ञानाने अफाट प्रगती केली आहे नाना शोध लावले असले तरी सहयाद्रीच्या दऱ्या खो-यात अजून ही असी गाव आहेत की आतिशय दुर्गम गावे आहेत. तेथील काही वाड्या वस्त्यांना रस्ते नाहीत. काही घरांना लाईट पोहचली नाही, दवाखाना, पोस्ट, बस नाही.

कळसुबाई हरिश्चंद्रगड अभय अरण्य अंतर्गत फोफसंडी हे अतिदुर्गम गाव ता .अकोले जि. अहमदनगर येथे आहे. खोल दरीत गाव आहे. येथे अजून दवाखाना, पोस्ट, बॅक, बस, धरण इत्यादी सुविधा नाहीत. येथील जीवनमान खूप अवघड आहे. हालाखीचे आहे.

नक्षत्रांचं देणं काव्यमंचची काव्य मैफल निसर्गरम्य वातावरणात फोफसंडी येथील ब्रिटीश अधिकारी पोप हाऊसच्या (फोफसंडीचा नाका )प्रांगणात माळरानावर उत्साहीत वातावरणात संपन्न झाली. काव्य सहलीला निरोप दिल्यानंतर ओढ लागली होती ती म्हणजे गावातच आजोळी मामांना भेट देण्याची .. अजूनही कावड्या डोंगराच्या कपारीत जनावरांसह राहतात.

संध्याकाळी घोडेवाडीतून मित्र सखा आंबेकर, भरत वाजे मी यश घोडे आम्ही माझ्या मामाच्या गुहेत ल्या घरात रात्री आठ वाजता पाऊल वाटेने हातात बॅटरी घेऊन चाललो होतो वाटेत आजुबाजुला तुरळक काजवे चमकताना दिसत होते.रिमझिम पाऊस पडत होता मंद गार वारा वाहत होता कड्या कपातीच्या वाटेने गुहेजवळ पोहचलो . मामाच्या गुहेत अंधार होता उजेडाचे साधन बॅटरी होती.मामांनी माझे व मित्रांचे स्वागत केले. आम्हांला पाऊल वाटेने चालताना खूप थंडी वाजली होती पण गडदीतल्या गोठ्यात कपारीत पोहचताच सर्व धंडी दूर पळाली .बाहेर थंडी तर आतले वातावरण उबदार होते . रात्री पर्यंत मामांशी गप्पा मारल्या सर्व परिस्थिती आम्हांला सांगितली मामांच्या परीवारात दोन मुलगे सुना नातवंडे आहेत. त्यांचा नातू आदित्य दत्तू वळे हा पाच वर्षाचा आहे. तो पायाने अपंग आहे. पायाने सरकत आमच्या जवळआला त्याला खाऊ दिला मामाने सांगितले कि त्याला दवाखान्यांत प्रवरानगर ,अकोले नगर येथे फिरवले प्रत्येक वेळी डॉ. भेटी झाल्या नाहीत .फोफसंडी ते बहिरोबा १५ कि प्रवास करत पायी चालत जावे लागते, पाठीला बांधून न्यावे लागते गावात बस नाही. दवाखाना नाही त्यामुळे बस खूप वेळ जातो. आणि तालुक्याच्या ठिकाणी कोणी विचारपूस करत नाही ताटकळत ठेवतात -परत गावी यायला बस नसते. कुठेतरी रात्री अपरात्री थांबावं लागतं कितीतरी हेलपाटे मारले पण फायदा झाला नाही त्याच्यावर उपचार झाले नाहीत.ते कळवळीने सांगत होते. माझा नातू दोन पायांवर उभा राहिलेला पाहायचा आहे. त्यांना धीर दिला तंत्रज्ञानाचे युग आहे.शस्त्रक्रिया सर्जरीने होईल. मोठ्या सरकारी दवाखान्यात व्यवस्था करुया किंवा एखाद्या दानशूर व्यक्ती कडे आवाहन करुया.आदित्य निश्चित बरा होईल.काशीनाथ दादू वळे यांची हि गडद सात आठ पिढ्यांची साक्षीदार आहे.सालोन सालचे नैसर्गिक घर आहे.बाजूने दगड मातीने लिपून काढलं आहे. ऊन वारा पाऊस निवारा या पासून चे नैसर्गिक घर आहे.ते कुटुंबासमवेत गाई गुरे शेळ्या सह मोठ्या गोठ्यात राहत आहेत. बाजूला कपारीत असलेल्या खोल्या म्हणजे जनावरां साठी लागणारा चारापेंढा ठेवण्यासाठी जागा दुसरी कपारी खोलीत. गोवऱ्या सरपण शेतीची अवजारे ठेवण्याचे साहित्य अस त्यांचे गडदीतले पिढ्यानपिढ्या चे बिनखर्खिक उबदार घर त्यातच राहायला आनंद मानतात.चढ उताराची शेती. भात नागली वरी सावा इतर त्यात जनावरांचे शेण टाकतात पावसाळ्यात सर्व वाहून जाते.शेतात काहीच पिकत नाही.पिकल तर टिकत नाहीअतिवृष्टीमुळे वाहून जाते.जगल तर दिवसा वानरं माकड खाऊन नासधूस करतात.त्यातूनही पिकल तर रात्री अपरात्री रानडुक्कर,सांबर,चितळ, गवा येऊन खाऊन जातात.उरलेल पिक रानची पाखरं खातात हातात काही पिक उरत नाही.रोजगार साधन नाही. डांगी जनावरां शिवाय पर्याय नाही.हिरवा चारा असे पर्यंत तीनच महिने फक्त दूध असतं.तेही थोड्याच प्रमाणात.पावसाळ्यात खूप पाऊस कोसळतो जनावरे सुध्दा मरतात.पंचनामा करुनही भरपाई मिळत नाही.तळमळीने सांगत होते इथे पिढ्यान पिढ्या असाच संघर्ष चालू आहे.माझा सहा वर्षाचा पायाने अपंग असलेला नातू पायांवर उभा राहिलेला चालताना पाहायचा आहे.काशिनाथ दादू वळे त्यांचा दिव्यांग नातू आदित्य दत्तू वळे त्यासाठी एक हात मदतीची आधाराची सहकार्याची गरज आहे.ज्या दानशूर व्यक्तींना मदत करायची असेल त्यांनी आदित्य चे वडील दत्तू काशिनाथ वळे यांच्या शी संपर्क करू शकता.. हातभार लावू शकता..

मोबाईल नंबर..

दत्तू काशिनाथ वळे 8208260308

फोन लागला नहीतर माझ्याशी संपर्क करू शकता

यशवंत घोडे.8975662035

———————————

शब्दांकन..कवी यश घोडे.फोफसंडीकर 8975662035

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे