Breaking
ब्रेकिंग

गत तीन दिवस धुवांधार पाऊस.. भंडारदरा धरण व निळवंडे धरण भरले. प्रवरा नदीला पूर, आदिवासी पट्टा गारठला.

संपादक -संजय मंडलिक

0 0 4 0 1 3

भंडारदरा प्रतिनिधी./-

गत तीन दिवस भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात धुवांधार पाऊस कोसळत असून सर्व ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे भंडारदरा धरणात प्रचंड पाण्याची आवक होऊन भंडारदरा धरणातून स्पिलवेद्वारे 25000 क्युसेक्स पेक्षाही जादा वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.

त्यामुळे निळवंडे धरण भरून मोठ्या प्रमाणात जायकवाडीला पाणी जात आहे. प्रवरा नदीला पूर आला असून सर्वत्र सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

भंडारदरा धरण परिसरात कधी नव्हे एवढे विहंगमदृश्य पहावयास मिळत असून कळसूबाईच्या शिखरावरून धो धो धबधबे कोसळत आहेत.

सर्वच फॉल मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात कोसळत असून पांजरे फॉल व धामणवाहाळ यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

भंडारदरा धरण भरल्यात जमा असून 97% लेवल मेंटेन ठेवून बाकी पाणी निळवण्यात सोडले जात आहे तर निळवंडे धरणातूनही मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे प्रवरा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

आज दिवसभरही पाऊस धो धो कोसळत होता. एकंदरच आदिवासी पट्टा गारठला असून अकोले तालुक्यातील सर्वच धरणे भरली आहेत. अगस्ती अमृत न्यूज. भंडारदरा.

5/5 - (1 vote)

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे