पावसाने रस्त्यावर झाडे आणि विजेच्या तारा पडल्यामुळे समाजसेवक अनंत घाणे यांच्या मदतीने वाहतूक सुरळीत.
संपादक -संजय मंडलिक
भंडारदरा प्रतिनिधी /-
अकोले तालुक्यातील आदिवासी भागात सतत कार्यरत असणारे आदिवासी बांधवांच्या सुख दुःखात सहभागी होणारे समाजसेवक डॉ.अनंत घाणे समाजकार्यात सतत अग्रभागी असतात यामुळे आदिवासी बांधवांमध्ये नेहमीच त्यांच्या कार्याच कौतुक होत असत कालही त्यांच्या समाजकार्याची झलक वाकी परीसरात पाहायला मिळाली. सध्या वाकी आणि एकूणच आदिवासी विभागात मुसळधार पाऊस पडत आहे वारा आणि पाऊस यामुळे वाकी ते फलके वस्ती या रस्त्यावर शुक्रवारी सकाळी एक मोठे झाड आणि विजेच्या तारा पडल्याने रस्त्यावरची वाहतूक बंद झाली होती. या रस्त्याने जाणारी रतनवाडी हि बस या झाडांमुळे आणि विजेच्या तारांमुळे रस्त्यातच अडकुन पडली होती. पुढे जाण्यासाठी बस ला कोणताही पर्याय नसल्यामुळे काय करावे असा प्रश्न निर्माण झाला होता. याचवेळी या सर्व प्रकाराची माहिती समाजसेवक अनंत घाणे यांना मिळाली. त्यांनी कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तातडीने वीज कर्मचारी , व बस कर्मचारी यांच्या मदतीने सदर झाड तसेच विजेच्या तारा रस्त्यातून दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आणि काही वेळातच रस्त्यात आलेला अडथळा दूर करण्यात आला. याबद्दल बस कर्मचारी ,वीज कर्मचारी व परिसरातील नागरिकांनी समाजसेवक अनंत घाणे यांच्या कामाचे कौतुक केले आणि सदर कामाबद्दल त्यांचे आभार मानले
