Breaking
ब्रेकिंग

रॅपलिंग करताना तरुणांनी काळजी घेणे गरजेचे… सहाय्यक वनसंरक्षक अनिल पाटील यांचे प्रतिपादन, घनकचऱ्याबाबत हॉटेल व्यवसायिकांनी अभयारण्य परिसरात काळजी घ्यावी, रेंज फॉरेस्ट अधिकारी गावीत साहेब यांचे वक्तव्य.

- भंडारदरा प्रतिनिधी.

0 0 4 0 1 3

शेंडी परिसरातील नऊ गावांमधील हॉटेल व्यवसायिकांची नुकतीच बैठक येथील फॉरेस्ट विश्रामगृहावर घेण्यात आली. याप्रसंगी सहाय्यक वनसंरक्षक अनिल पाटील तसेच आर एफ गावीत साहेब, वनपाल लांडे साहेब, तळपाडे साहेब आदींनी मार्गदर्शन केले. स्थानिक तरुणांनी फॉरेस्ट खात्यामार्फत केली जाणारी कामे उत्कृष्ट पद्धतीने व्हावीत व स्थानिक तरुणांना रोजगार मिळावा अशी मागणी केली. तर सहाय्यक वनरक्षक पाटील साहेब यांनी रॅपलिंग करताना पर्यटकांचा इन्शुरन्स काढावा तसेच अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी, असे सूचित केले. आर एफ गावित साहेबांनी घनकचऱ्याबाबत सर्व हॉटेल व्यवसायिकांना बॅग वाटप करून दर आठवड्याला सदर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक कचरा गाडी परिसरात फिरवली जाईल, त्यात सर्वांनी कचरा जमा करून द्यावा असे आवाहन केले. एकंदरच बैठकीत साधक बाधक चर्चा होऊन अभयारण्य परिसरातील पर्यटनवाढीबाबत सकारात्मक चर्चा झाली. यावेळी मारुती बांडे, संजय मंडलिक, अभिराज नाईकवाडी, आदिंसह परिसरातील अनेक व्यावसायिक हजर होते.

अगस्ती अमृत न्यूज, अकोले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे