अकोले तालुक्यात शासनाने सरसगट कर्जदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी – समाजसेवक .अनंत घाणे .
संपादक -संजय मंडलिक
अकोले प्रतिनिधी /-
गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी कर्जमाफी बाबत सोशल मीडिया विविध माध्यमातून शेतकरी कर्जमाफी बाबत चर्चा होत आहे चर्चा चालू आहे. यामुळे शेतकरी संभ्रम अवस्थेत आहे संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. मागील काळात शेतकरी कर्जमाफी झाली पण कुणाची झाली ज्यांनी कर्ज घेतले त्यांनी भरलेच नाही त्यांची कर्जमाफी झाली. जे मयत शेतकरी झाले त्यांची कर्जमाफी झाली. परंतु ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली सहकारी बँका चालवल्या सहकारी संस्था टिकून ठेवल्या त्या शेतकऱ्यांवर मात्र अन्याय झाला. अनुदानापासून आजही ते शेतकरी कायम वंचित आहेत. सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व भागातील शेतकऱ्यांचे नुकसान होऊन उत्पन्नात घट झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे .प्रथम शेतकरी यांचा विचार करून शासनाने प्रशासनाकडून अहवाल मागून कोणतेही निकष न लावता कर्जदार शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने समाजसेवक अनंत महादू घाणे. बा.स.सं. तुकाराम खाडे. उन्नती अध्यक्ष भरत घाणे. नरहरी इदे .भोरू खाडे. निवृत्ती बुळे. बाजीराव सगभोर . रामदास पिचड . चंद्रकांत सगभोर . भाऊराव भांगरे . योगेश खाडे .अवी पवार. अशोक भोजने . एकनाथ सारूक्ते . दत्तु खाडे .सह कर्जदार शेतकऱ्यांनी केली आहे. तेव्हा या मागणीचा शासनाने लवकरात लवकर विचार करावा आणि सरसकट कर्जमाफी कोणतेही निकष न लावता करावी. शासनाने आदिवासी भागातील सहकारी सोसायट्यां ज्या डबघाईस आलेल्या आहेत. त्यांना आदिवासी विकास विभागातुन बजेट मधुन आर्थिक सहाय्य करून ऊर्जीत अवस्थेत आणुन शेतकरी यांना आर्थिक मदत दिली जावी. अशी मागणी समाज सेवक अनंत घाणे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
