Breaking
ब्रेकिंग

जायकवाडी धरण 70 टक्के भरले. पुढील आठ दिवसात भरण्याची शक्यता

संपादक -संजय मंडलिक

0 0 4 0 1 3

सं . नगर. प्रतिनिधी./-

मराठवाड्याची जीवनदायी असणारे जायकवाडी धरण आज सकाळी 70 टक्के भरले असून जायकवाडी धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. उर्वरित 30 टक्के धरणही पुढील आठ दिवसात भरून वाहू लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 99 टक्के असून निळवंड्याचा 92 टक्के आहे.निळवंडे धरणातून 9450 वेगाने पाणी नदीपत्रात सोडण्यात येत असून भंडारदरा धरणातून अम्ब्रेला फाॅल, स्पिलवे ,जलविद्युत प्रकल्प याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी निळवंड्यात येत आहे. गोदावरी आणि मुळा दोन्ही धरणातून पाणी जायकवाडीला जात असून जायकवाडी धरण लवकरच भरेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे जायकवाडी भरल्यामुळे नगर जिल्ह्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सुटेल कारण जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे मागील वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात हाल झाले होते.त्यामुळे जायकवाडी भरत असल्यामुळे मुळा व भंडारदऱ्याच्या पाणलोटातही आनंद व्यक्त केला जात आहे. अगस्ती अमृत न्यूज.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

अगस्ती अमृत

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 4 0 1 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे